भुसावळातील भोळे महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी


Mahatma Phule Jayanti celebrated at Bhole College, Bhusawal भुसावळ (13 एप्रिल 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात ‘सामाजिक गुलामगिरीचा’अंधार सर्वत्र दाटला असताना ज्यांच्या पावलानी ‘सार्वजनिक सत्यधर्माची’ पहाट या देशाच्या दारी आली अशा पुरोगामी विचारांचे थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी माल्यार्पण केले. त्यांनी विद्यार्थ्याना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आदर्श घेतला पाहिजे, असे आवाहन करीत फुलेंच्या जीवनकार्याचे सविस्तर वर्णन विद्यार्थ्यांसमोर मांडले.


कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनातर्फे करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, शिक्षकेतर कर्मचारी मिलिंद नेवाळे, राजेश पाटील, प्रमोद नारखेडे, किरण पाटील, प्रकाश चौधरी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे विद्यार्थी उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख डॉ.संजय धर्मा चौधरी कळवतात.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !