मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : शेतकर्‍यांना दिवसभर वीज ; महाराष्ट्रात वीज बिल कमी होणार !


Chief Minister’s big announcement : Farmers will get electricity all day ; Electricity bills will be reduced in Maharashtra! वर्धा (13 एप्रिल 2025) : राज्यातील वीज ग्राहकांसाठी मुख्यमंत्र्यांनी गुड न्यूज दिली आहे. महाराष्ट्रात वीज बिल कमी होण्यासह शेतकर्‍यांना दिवसभर वीजपुरवठा होईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी वर्धा येथील आर्वी येथे केली.

आर्वी येथे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणले, महाराष्ट्र देशातील पहिले असे राज्य ठरले आहे, की ज्या राज्याने विजेचे बिल दर पाच वर्षांनी कमी करून दाखवले आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोअर वर्धा प्रकल्पावर पाचशे मेगा वॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. वर्धा जिल्हा सौर उर्जेच्या बाबतीत पूर्णतः स्वयंपूर्ण होईल तर नेरी मिर्झापुर गावाला संपूर्ण सौर ऊर्जा देण्यात आली आहे, असे म्हणत फडणवीस यांनी येथील गावकर्‍यांचे अभिनंदन केले आहे.


देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकर्‍यांना दिवसभर शेतीसाठी वीज देऊ अशी घोषणा केली होती. 80 टक्के महाराष्ट्रात आता लवकरच दिवसा 10 तास वीज उपलब्ध करून दिली जाईल. विहिर पुनर्भरण ही योजना जर हातात घेतली तर त्याचा फायदा होईल, विहिरींची पातळी वाढेल, आपण जर असाच उपसा करीत राहिलो तर आपलाही प्रदेश रेगिस्थान झाल्याशिवाय राहणार नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !