गुजरातमध्ये 1800 कोटींचे ड्रग्ज जप्त : एटीएस व तटरक्षक दलाच्या कारर्वाने तस्कर हादरले
एटीएस व तटरक्षक दलाच्या कारर्वाने तस्कर हादरले

Drugs worth Rs 1800 crore seized in Gujarat : ATS and Coast Guard action shakes smugglers अहमदाबाद (14 एप्रिल 2025) : एटीएस व तटरक्षक दलाने गुजरातमध्ये मोठी कारवाई करीत अरबी समुद्रातून जवळपास 300 किलो ड्रग्स पकडले तर तस्करांची बोट सागरी सीमा पार करून निघून गेली. त्यामुळे तरक्षक दलाला पाठलाग थांबवावा लागला.
गुजरातच्या समुद्रात ही कारवाई गुजरात एटीएस आणि इंडियन कोस्ट गार्डच्या संयुक्त विद्यमाने 12-13 एप्रिलच्या रात्री करण्यात आली.
या बोटीवरील तस्करांनी भारतीय तटरक्षकदलाचं जहाज त्यांच्या जवळ येत असल्याचं पाहिलं आणि त्यांनी त्यांच्याजवळील अंमली पदार्थांचा साठा समुद्रात फेकून दिला. तसेच बोट घेऊन ते सागरी सीमेच्या दिशेने निघाले. त्यांना भारताची सागरी सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करायचा होता. मात्र, तटरक्षक दलाने त्यांची छोटी नाव समुद्रात उतरवली. त्या नावेवरील कर्मचार्यांनी तस्करांनी समुद्राच्या पाण्यात फेकून दिलेले अंमली पदार्थ शोधले आणि जप्त केले. तर आयसीजीच्या जहाजाने तस्करांच्या बोटीचा पाठलाग केला.
सागरीमार्गे ड्रग्स आणि अन्य नशेचे पदार्थ तस्करी रोखण्यासाठी मागील वर्षी 2024 मध्ये ऑपरेशन सागर मंथन सुरू करण्यात आले होते. त्यात एनसीबी ऑपरेशन ब्रांचचे अधिकारी, भारतीय नौदलाची गुप्तचर यंत्रणेसह इंडियन कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएसचा समावेश करण्यात आला होता. या ऑपरेशन सागर मंथन अंतर्गत मागील वर्षी एकूण 3400 किलो ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला होता. त्याशिवाय 11 इराणी नागरिक आणि 14 पाकिस्तानी नागरिकांनाही अटक करण्यात आली होती.
ऑपरेशन सागर मंथन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नशेच्या पदार्थाविरोधात सुरू केलेली मोहीम होती.