निलंबित पोलिस अधिकार्याचा खळबळजनक दावा : वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर
Suspended police officer’s sensational claim : Valmik Karad’s encounter offer बीड (15 एप्रिल 2025) : मस्साजोग सरपंच हत्येनंतर बीडच्या सायबर पोलिस विभागात कार्यरत असलेले मात्र सध्या निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी धक्कादायक दावा केला आहे. वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची आपल्याला ऑफर देण्यात आली होती त्या बदल्यात 5 ते 50 कोटीची दिले जाणार होते, असे सांगत त्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
रणजित कासले यांनी निलंबनांतर अनेक दावे सोशल मीडियावर केले आहेत. आता वाल्मीक कराडच्या एन्काउंटरबाबत दावा केल्याने खळबळ उडाली आहे. कासले यांनी व्हिडिओत म्हटले आहे की, मला सुरुवातीला 5 कोटी, नंतर 10 कोटी, आणि त्यानंतर 50 कोटींची ऑफर होती.

काही दिवसांपूर्वी रणजीत कासले यांनी गुजरातमध्ये जाऊन एक कोटी रुपयाची मागणी करतानाचा व्हिडिओ आणि पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आला तसेच काही फोटोग्राफही समोर आले होते. ज्यात बंदूक ठेवून दहशत निर्माण करत असल्याचे दिसत आहे.
