25 कोटींच्या योजनेचे पाणी पोहोचले वरणगावातील ‘फिल्टरवर’
चिंता मिटली : भाजपा पदाधिकार्यांचा ढोल-ताशे व पेढे वाटून जल्लोष
Water from a Rs 25 crore project reached the jackwell in Varangaon भुसावळ (15 एप्रिल 2025) : वरणगाव शहरासाठी 19 सप्टेंबर 2019 रोजी मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी तब्बल पाच वर्षानंतर वरणगाव शहरातील फिल्टर प्लांटवर पोहोचले आहे. पाणी आल्यानंतर माजी नगराध्यक्ष सुनील काळेंसह सहकार्यांनी पेढे वाटून व ढोल-ताशे वाजवून जल्लोष केला
अडथळ्यांची शर्यत पार करीत योजना पूर्णत्वाकडे
सुनील काळे नगराध्यक्ष असतांना वरणगावकरांना 24 तास पाणी मिळण्यासाठी 2019 मध्ये 25 कोटी रुपये खर्चाची पाणीपुरवठा योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून व तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन व आमदार संजय सावकारे यांच्या सहकार्याने मंजूर करण्यात आली होती. योजना पूर्ण होण्यामध्ये अनेकांनी अडथळे आणले तर पाणी योजना सुरू होणार नाही, अशा वावटळ्या उठवण्यात आले मात्र सुनील काळे व सहकार्यांनी दंड थोपटत प्रयत्नांची पराकाष्ठा केली, प्रसंगी
हंडा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करीत मुख्याधिकार्यांना घेराव घातला व तापी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केल्यानंतर प्रशासनाकडून योजना पूर्णत्वासाठी हालचाली झाल्या.

पाणी येताच पदाधिकार्यांचा जल्लोष
आंदोलनाची शासनाने दखल घेत 10 एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र त्यानंतरही पाणी न आल्यानंतर ठरल्याप्रमाणे शनिवार, 12 रोजी फिल्टर प्लांटभर उन्हात ठिय्या आंदोलन सुरू झाल्यानंतर नवीन पाईप लाईनद्वारे पाणी फिल्टर प्लांटवर दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पेढे वाटण्यात आले तसेच ढोल-ताशे वाजवून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी नंदू महाराज यांनी मंत्र म्हणून जलपूजन केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी जल्लोषात भाजपा अध्यक्ष सुनील माळी, शामराव धनगर, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, कामगार नेते मिलिंद मेढे, मिलिंद भैसे, मयूर शेळके, मुस्लीम अन्सारी, फझल भाई, नाना चौधरी, हितेश चौधरी, योगेश माळी, रमेश पालवे, डॉ.नाना चांदणे, किशोर वाघमारे, नामदेव पहेलवान, सोनवणे, पप्पू ठाकरे, आवेश खान, सुभाष भील, अजमल भाई, साबीर कुरेशी, नगर परिषदेचे मुक्तारभाई, निलेश झांबरे यांच्यासह असंख्य संख्येने वरणगावकर उपस्थित होते.
