मूल्य शिक्षण गीता प्रतियोगितेतील गुणवंत विद्यार्थ्याचा मंत्री संजय सावकारेंच्या हस्ते गौरव


 Gita Competition भुसावळ (16 एप्रिल 2025) : इस्कॉन भुसावळतर्फे आयोजित मूल्य शिक्षण गीता प्रतियोगितेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवारी पार पडला. या सोहळ्यात मान्यवर संजय मंत्र सावकारे यांच्याहस्ते 100 विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. विशेष म्हणजे वर्ल्ड स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी तसेच सेंट अलॉसीयस, पोदार आणि एन.के.नारखेडे शाळेतील प्रत्येकी एका विद्यार्थ्याने जिल्ह्यातून अव्वल येत सायकल बक्षीस पटकावले.

भुसावळच्या चार विद्यार्थ्यांची इस्त्रो भेटीसाठी निवड
फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेल्या या जागतिक स्तरावरील मूल्य शिक्षण प्रतियोगितेत भुसावळच्या चार विद्यार्थ्यांनी इस्रो भेटीसह इलेक्ट्रॉनिक सायकल बक्षीस मिळवले. इस्कॉन पुणे, इस्कॉन भुसावळ आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली. भुसावळच्या विद्यार्थ्यांनी यात भरघोस यश मिळवले. सेंट अलॉयसीस आणि वर्ल्ड स्कूल या दोन शाळांनी विजेतेपदाचा मान मिळवला तर जिल्ह्यातील 14 शाळांनी ज्यांच्या 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळविले. त्यांना उत्तीर्णतेचा सन्मान मिळाला. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.


मूल्य शिक्षणाच्या उपक्रमांची नितांत गरज
मंत्री संजय सावकारे यांनी इस्कॉनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, आजच्या तणावपूर्ण काळात अशा मूल्य शिक्षणाच्या उपक्रमांची नितांत गरज आहे. इस्कॉनने युवक आणि विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या या कार्याची प्रशंसा करावी तितकी थोडी आहे. त्यांनी आयोजकांचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. हा कार्यक्रम इस्रो बेंगळुरू, इस्कॉन पुणे आणि इस्कॉन भुसावळ यांच्या संयोजनाने पार पडला. यशस्वी आयोजनासाठी इस्कॉन भुसावळ मंदिराचे अध्यक्ष श्रीमान रास यात्रा प्रभू यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !