धरणगाव शिवारातील पत्र्याच्या शेडमध्ये प्रौढाची आत्महत्या

Adult commits suicide in a paper shed in Dharangaon Shivar धरणगाव (18 एप्रिल 2025) : धरणगाव शिवारातील शेतात 51 वर्षीय प्रौढ व्यक्तीने शेतातील पत्री शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. ही घटना मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजता समोर आली. मनोज पुन्हा कंखरे (51, रा.धरणगाव) असे मयताचे नाव आहे.
मनोज कंखरे हे आपल्या परिवारासह धरणगाव शहरात वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदर निर्वाह करत होते. मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान त्यांनी धरणगाव शिवारातील त्यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येेचे कारण समोर आले नाही.
नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली व कंखरे यांना धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक करीम सय्यद करीत आहे.




