न्यूरोलॉजिस्ट डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण : ब्लॅक मेल करणार्या प्रशासकीय महिला अधिकार्याला बेड्या

Neurologist Dr. Shirish Valsangkar suicide case: Female administrative officer who blackmailed her arrested सोलापूर (20 एप्रिल 2025) : शहरातील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी वळसंगकर हॉस्पिटलमधील प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे-माने हिला सोलापूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. मनिषा ही डॉक्टरांना ब्लॅकमेल करीत होती तसेच घाणेरडे व खोटारडे आरोप करीत असल्याने त्या तणावातून डॉक्टरांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.
आरोपी महिलेला अटक
डॉक्टरांच्या आत्मप्रकरणी त्यांचा मुलगा डॉ. अश्विन शिरीष वळसंगकर (वय 45 वर्ष, रा. एस.पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस, वळसंगकर हॉस्पिटल, मोदी रेल्वे क्रॉसिंग, सोलापूर) यांच्या तक्रारीवरून मनिषा मुसळे-मानेविरोधात रात्रीच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला अटक केली.
डॉ.अश्विन यांच्या फिर्यादीनुसार, हॉस्पिटलमधील प्रशासकीय अधिकारी मनिषा माने हिने वेळोवेळी सहकार्य करूनदेखील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्यावर खोटे आरोप करून धमकी वजापत्र पाठवल्याने फिर्यादीच्या वडिलांनी त्या महिलेच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी स्वतःच्या बेडरूममधील अटॅच असलेल्या बाथरूममध्ये स्वतःच्या परवाना असलेल्या पिस्टलमधून कानशीलमध्ये गोळी झाडून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.