कापसाला फवारणी करताना सर्पदंश झाल्याने तरुणाचा मृत्यू


यावल : तालुक्यातील टाकरखेडा शेतमजुराला सर्पदंश झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू ओझवला. प्रवीण प्रकाश पाटील (25) असे मयताचे नाव आहे. तालुक्यातील टाकरखेडा येथील संजय महाजन यांच्या शेतात प्रवीण पाटील हा कपाशीवर फवारणीसाठी गेला असताना अचानक त्याच्या पायाला विषारी सर्पाने दंश केला. त्यानंतर त्याने तातडीने गावात पायी येत ही घटना शेतमालक संजय महाजन यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले मात्र त्यापूर्वीच प्रवीणचा मृत्यू झाला. शेतमालक महाजन यांच्या खबरीवरून येथील यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली. तपास सहा.फौजदार अजीत शेख करीत आहेत. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृताच्या पश्‍चात वृद्ध आई आहे.


कॉपी करू नका.