भुसावळ तालुक्यातील 20 जागांवर सर्वसाधारण आरक्षण


General reservation for 20 seats in Bhusawal taluka भुसावळ (22 एप्रिल 2025) : भुसावळ तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीच्या 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंच पदाची आरक्षण सोडत सोमवारी तहसीलदार निता लबडे यांच्या उपस्थितीत निघाली. 39 पैकी 20 जागांवर सर्वसाधारण आरक्षण राहणार असून आठ गावांमध्ये अनुसूचित जाती, सात जागांवर अनुसूचित जमाती तर चार जागांवर नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी असे आरक्षण निघालेे आहे. यातील 50 टक्के जागांवर महिला आरक्षण सोडत मंगळवारी सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी कार्यालयातील तापी सभागृहात निघणार आहे.

या गावांसाठी निघाले आरक्षण
सरपंच आरक्षण सोडतीत 2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जाती लोकसंख्येचा उतरत्या क्रमानुसार पिंपळगाव, वांजोळा- मिरगव्हाण, खंडाळे, खडके, चोरवड – खेडी बु., हतनूर- सावतर निंभोरा, आचेगाव व कुर्‍हे प्र. न. या गावांमध्ये अनुसूचित जाती आरक्षण काढण्यात आले तर अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गासाठी टहाकळी, दर्यापूर, कन्हाळे बुद्रूक, किन्ही, फुलगाव, साकरी, फेकरी या सात ग्रामपंचायतीचे आरक्षण निघाले तर नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी जागेसाठी तळवेल, वेल्हाळे, मन्यारखेडा व ओझरखेडा या गावांचे आरक्षण काढण्यात आले. यातील तळवेलचे आरक्षण थेट निश्चित करण्यात आले तर उर्वरित तीन गावांचे आरक्षण ऋजल चौधरी या आठ वर्षीय बालकाच्या हातून ईश्वर चिठ्ठीव्दारे काढण्यात आले. यावेळी तहसीलदार निता लबडे आदींसह सर्व अधिकारी, गावातील नागरिक, पदाधिकारी उपस्थित होते.


20 गावांमध्ये सर्वसाधारण आरक्षण
भुसावळ तालुक्यातील 39 पैकी 20 गावांमध्ये सर्वसाधारण आरक्षण आहे. यात काहूरखेडा-मानपूर, पिंप्रीसेकम – निंभोरा बुद्रूक, सुसरी, जागेलखेडा- भानखेडा प्र. ए, सुनसगाव- गोंभी, गोजोरा, मोंढाळे, पिंपळगाव बुद्रक, साकेगाव, मांडवेदिगर भिलमळी, अंजनसोंडे, बोहर्डी बुद्रूक -बोहर्डी खुर्द, बेलव्हाय, जाडगाव, कठोरा बुद्रूक, कठोरा खुर्द, कंडारी, शिंदी, वराडसीम यांचा समावेश आहे. जनरल आरक्षणामुळे या गावातील निवडणुका चुरशीच्या होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !