यावल 63 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहिर : 50 टक्के महिलांना मिळेल संधी


Reservation announced for 63 Gram Panchayats in Yaval: 50 percent women will get opportunity यावल (22 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीपैकी 63 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत सोमवार, 21 रोजी सोमवारी काढण्यात आली. दोन सत्रात जाहिर करण्यात आलेल्या आरक्षणात 50 टक्के जागांवर महिलांना संधी देण्यात आली.

63 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत
यावल तालुक्यात एकुण 67 ग्रामपंचायती आहेत. यातील चार ग्रामपंचायतीचे आरक्षण या पूर्वीच जाहिर झाले आहे तर उर्वरीत 63 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोमवारी तहसील कार्यालयात दोन सत्रात जाहिर करण्यात आले. सकाळच्या सत्रात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी 63 ग्रामपंचायतीत अनुसुचित जातीसाठी 8 सरपंचपद, अनुसूचित जमातीसाठी 21 सरपंचपद, मागास प्रवर्गासाठी दोन सरपंचपद व सर्वसाधारण करीता व 32 सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहिर केले.


दुपारी दोन वाजेपासुन प्रांताधिकारी बबन काकडे यांनी या सर्व 63 ग्रामपंचायतीत विविध प्रवर्गा सह एकुण महिलांसाठीच्या 33 जागेवरील आरक्षण जाहिर केले. प्रक्रीयेकरीता निवासी नायबत तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, सुयोग पाटील यांनी कामकाज पाहिले. विविध आरक्षण संदर्भातील ईश्वर चिठ्ठी इश्वरीय धांडे (रा.किनगाव), दिव्या वाघुळदे व रिया वाघुळदे (रा.मालोद) या बालिकांच्या हाताने काढण्यात आल्या. सकाळपासून या आरक्षण सोडत करीता नागरीकांनी तहसील कार्यालयात गर्दी केली.

असे आहे आरक्षण
अनुसुचित जमाती राखीव- भालशीव, मोहराळे, सावखेडासीम, किनगाव बुद्रुक, पिळोद खुर्द, पाडळसे, सांगवी खुर्द, थोरगव्हाण, बोराळे, राजोरा.

अनुसुचित जामाती महिला राखीव- बोरावल बुद्रुक, वढोदे प्र. यावल, बोरखेडा बुद्रुक, वड्री खुर्द, मनवेल, कोसगाव, मारूळ, बोरावल खुर्द, बामणोद, विरोदे चिखली बुद्रुक अनुसुचित जाती राखीव- पिंप्री, हंबर्डी, पिंपरूड, नावरे, अनुसूचित जाती महिला राखीव- सांगवी बुद्रुक, अट्रावल, कोळवद, म्हैसवाडी.

नामाप्र- चिखली खुर्द, नामाप्र महिला राखीव- वढोदे प्र.सावदा

सर्वसाधारण- डांभूर्णी, चिंचोली, विरावली बुद्रुक, किनगाव खुर्द, आमोदे, निमगाव, हिंगोणे, सातोद, महेलखेडी, पिळोदे बुद्रुक, चितोडा, टाकरखेडा, वनोली, कासरखेडे, नायगाव, शिरागड.

सर्वसाधारण महिला राखीव- कोळन्हावी, चुंचाळे, कासवे, आडगाव, गिरडगाव, शिरसाड, दुसखेडा, कोरपावली, अंजाळे, डोंगरकठोरा, उंटावद, साकळी, न्हावी, भालोद, दहिगाव, डोणगाव.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !