रावेर तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीवर येणार महिलाराज


Mahilaraj will come to 43 Gram Panchayats in Raver taluka रावेर (22 एप्रिल 2025) : रावेर तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत सोमवारी करण्यात आली. यामध्ये तब्बल 43 ग्रामपंचायतीवर महिलाराज असेल. सोमवारी सकाळी 11 वाजता रावेर तहसील कार्यालयात तहसीलदार बी.ए.कापसे यांच्या उपस्थितीत 82 ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत काढण्यात आले. दुपारी चार वाजता फैजपूर उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांच्या उपस्थितीत महिला आरक्षण काढण्यात आले.

यांची होती उपस्थिती
निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, नायब तहसीलदार आर.डी.पाटील, सचिन पाटील, विठोबा पाटील, यासीन तडवी, भूषण कांबळे यांनी याकामी सहकार्य केले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .


ग्रामपंचायतचे आरक्षण व महिला आरक्षण असे
अनुसुचित जाती- विवरे खूर्द, मस्कावद बु.॥, खिरोदा प्र.रावेर, गहुखेडा, मुंजलवाडी, वाघोदे खुर्द,

अनुसूचित जाती महिला- कुंभारखेडा, मांगी चुनवाडे, सावखेडा बु.॥, पाडळे खुर्द, धामोडी, कळमोदे, खानापूर

अनुसुचित जमाती- मस्कावदसीम, कोचूर बु.॥, निरूळ, नेहेते, पुनखेडा

अनुसूचित जमाती महिला- चिनावल, भोर, सुदगाव, दोधे, थेरोळे, वाघोड .

नामाप्र- वाघोदा बु.॥, कर्जोद, थोरगव्हाण, सिंगत, अहिरवाडी, खिर्डी बु.॥, रमजीपूर

नामाप्र महिला- उटखेडा, सुनोदा, अजनाड, विवरे बु.॥, रणगाव, खिर्डी खुर्द, वाघाडी, अजंदे,

सर्वसाधारण- भोकरी, केर्‍हाळे खुर्द, वडगाव, तासखेडा, भाटखेडा, बलवाडी, केर्‍हाळे बु.॥, खिरोदा प्र.यावल, रसलपूर, उदळी बु.॥, रोझोदा, तांदलवाडी, तामसवाडी – बोरखेडा, खिरवड, अटवाडे, पातोंडी, मांगलवाडी ,सुलवाडी, कांडवेल, बक्षीपूर, दसनुर -सिंगनुर ग्रुप,

सर्वसाधारण महिला- रेंभोटा पुरी-गोलवाडे, गाते, कोचूर खुर्द, गौरखेडा, रायपूर, कोळोदे, नांदूरखेडा, सावखेडा खुर्द, विटवे, निंबोल, आंदलवाडी, ऐनपूर, उदळी खुर्द, शिंगाडी, मोरगाव खुर्द, निंभोरासीम, शिंदखेडा, मस्कावद खुर्द, मोरगाव बु.॥, निंभोरा बु.॥, धुरखेडा.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !