मुक्ताईनगर तालुक्यात 32 जागांवर सरपंच पद खुले
आठ जागांवर एससी, 11 एसटी तर 10 जागा ओबीसी राखीव
Sarpanch post open on 32 seats in Muktainagar taluka मुक्ताईनगर (22 एप्रिल 2025) : मुक्ताईनगर तालुक्यातील 61 ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत सोमवारी मुक्ताईनगर येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार गिरीश वखारे यांच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आली. त्यात अनुसूचित जातीसाठी आठ (चार महिला), अनुसूचित जमाती 11 (सहा महिला), ओबीसी 10 (पाच महिला) व खुल्या प्रवर्गासाठी 32 (16 महिला) असे आरक्षण निघाले. प्रसंगी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच, सदस्य उपस्थित होते. मोहित मुकेश मोरे (9, पातोंडी) या बालकाच्या हस्ते आरक्षणाची चिठ्ठी काढण्यात आली.
अनुसूचित जाती (आठ पैकी चार जागांवर महिला)
बेलसवाडी, हरताळे, खामखेडे व चिंचोल (महिला) तर राजुरे, शेमळदे, हिवरे, व ईच्छापूर
अनुसूचित जमाती (11 जागांपैकी सहा जागा महिला)
चांगदेव (महिला), अंतुर्ली, धामणगाव (महिला), रुईखेडा, पारंबी (महिला), निमखेडी खुर्द (महिला), कुर्हा (महिला), टाकळी (महिला), भोटा, मेहुण, पिंप्राळा
नागरीकांचा मागास प्रवर्ग (एकूण 10 जागा त्यापैकी पाच महिला)
महालखेडा (महिला), दुई, काकोडा (महिला), तरोडा (महिला), सुकळी, चिखली (महिला), बोरखेडा, कोर्हाळा, मानेगाव, पातोंडी (महिला)
सर्वसाधारण (32 पैकी 16 महिला)
चिंचखेडा खुर्द, हलखेडा, लोहारखेडे, बोदवड, पिंप्रीपंचम, धामणदे, निमखेडी बु.॥, माळेगाव, सातोड, सुळे, जोंधनखेडा, पिंप्रीअकाराऊत, वढवे, कर्की, सालबर्डी, कोथळी (सर्व महिला) तर सर्वसाधारण सारोळा, वायला, पुरनाड, उचंदा, घोडसगाव, नायगांव, मोंढळदे, नरवेल, मेळसांगवे, पिंप्रीनांदू, थेरोळा, चिंचखेडे बु.॥, वढोदा, नांदवेल, पंचाणे, चारठाणा


