यावल भाजपाच्या मंडळाध्यक्षपदी सागर कोळी


Sagar Koli appointed as Yaval BJP mandal president यावल (22 एप्रिल 2025) : यावल शेतकी संघाच्या सभागृहात रविवारी भारतीय जनता पार्टीच्या तालुका मंडळाध्यक्षांची निवड सर्वानुमते करण्यात आली. यात किनगाव – साकळी मंडळाध्यक्षपदी अनिल पाटील, यावल मंडळाध्यक्षपदी सागर कोळी तर फैजपूर मंडळाध्यक्षपदी उमेश बेंडाळे यांची निवड करण्यात आली. निवडी नंतर नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करण्यात आले.

पदाधिकार्‍यांची एकमताने निवड
यावल तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात रविवारी दुपारी भारतीय जनता पार्टीच्या यावल तालुक्यातील विविध मंडळांच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन, भरत महाजन, नारायण चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सविता भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यात किनगाव-साकळी मंडळाध्यक्षपदी किनगाव खुर्द येथील अनिल रामराव पाटील यांची निवड करण्यात आली तर यावल मंडळाध्यक्षपदी राजोरा येथील सागर कोळी व
फैजपूर मंडळाध्यक्षपदी उमेश बेंडाळे यांची निवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
भाजपाकडून तालुकाध्यक्ष पद हे रद्द करण्यात आले आहे. संपूर्ण तालुक्याचे तीन मंडळात विभाजन करीत तीन मंडळाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. या निवड प्रकियेत बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, पिंटू राणे, उजैन्नसिंग राजपुत, रितेश बारी, संजय पाटील यांची उपस्थिती होती.

भाजपाकडून तालुकाध्यक्ष नव्हे आता मंडळाध्यक्ष
भारतीय जनता पार्टीकडून तालुकाध्यक्ष पद रद्द करून त्याचे विस्तार करण्यात आले आहे. यात यावल तालुक्यात पूर्व भागात फैजपूर मंडळाची निर्मितीसह मध्य भागात यावल मंडळाची निर्मिती व पश्चिम भागात किनगाव-साकळी मंडळाची निवड करीत तालुकाध्यक्षांऐवजी तीन मंडळाध्यक्ष निवडण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !