यावल शहरात शिवसेना शिंदे गटाकडून ऑनलाईन सदस्य नोंदणीस शुभारंभ


यावल (23 एप्रिल 2025) : शहरात शिवसेना शिंदे गटाकडून ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानास सुरवात करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत शहर व तालुका स्तरावरील कामकाजाचा आढावा घेण्यात आला व अभियानास सुरवात झाली. शहरातून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

आगामी निवडणुकांसाठी कामाला लागा
शहरात नगरपालिका व्यापारी संकुला शेजारील नियोजित मंगल कार्याल्यात शिवसेना शिंदे गटाची बैठक मंगळवारी झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख समाधान महाजन होते. या बैठकीत त्यांनी आगामी होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणूक संदर्भातील स्थानिक पातळीवरील तयारीचा आढावा घेतला तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाला त्यांच्याहस्ते सुरवात करण्यात आली व कार्यकर्त्यांकडून शहरातून ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.

शहरात सभासद नोंदणी ही प्रत्येक वार्डानुसार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोमाने सुरू केली जाईल, अशी ग्वाही प्रसंगी उपजिल्हा संघटक नितीन सोनार, तालुकाप्रमुख राजू काटोके, शहर प्रमुख पंकज बारी यांनी दिली. शहरातील प्रत्येक प्रभागात शिवसेना संघटन मजबुत करण्याच्या सुचना जिल्हा प्रमुखांनी केल्या आहे. या प्रसंगी उपशहर प्रमुख राजू सपकाळे, चेतन सपकाळे, युवा सेना तालुकाप्रमुख अजय तायडे यांची उपस्थिती होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !