रावेर तालुक्यात भाजपाची नवीन रणनिती ; तीन मंडळ तालुकाध्यक्ष


BJP’s new strategy in Raver taluka ; Three mandal taluka presidents रावेर (23 एप्रिल 2025) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने रावेर तालुक्यात नवीन राजकीय समीकरणांची पायाभरणी करत, तालुक्यासाठी एक नवकल्पना राबवली आहे. रावेरात झालेल्या जाहीर बैठकीत भाजपाने प्रथमच तीन मंडळ तालुकाध्यक्षांची नियुक्ती करत राजकीय वर्तुळात चर्चेला नवा रंग दिला आहे.

तीन पदाधिकार्‍यांची निवड
रावेरात भारतीय जनता पक्षाच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच झाली. रावेर उत्तर मंडळ तालुकाध्यक्षपदी रवींद्र पाटील, रावेर दक्षिण तालुकाध्यक्षपदी अ‍ॅड.सूर्यकांत देशमुख तर सावदा मंडळाचे तालुकाध्यक्षपदी दुर्गादास पाटील या तिघांच्या नावांची घोषणा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रदेश सदस्य सुरेश धनके, निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, डॉ.केतकी पाटील, रंजना पाटील, राकेश पाटील, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, सी.एस.पाटील, सुनील पाटील, श्रीकांत महाजन, हरिलाल कोळी, जितू पाटील, महेश चौधरी, महेश पाटील, संदीप सावळे, राजन लासूरकर, नितीन पाटील, वासुदेव नरवाडे, महेंद्र पाटील, अरुण शिंदे आदींची उपस्थिती होती.

भाजपाचे सोशल इंजिनिअरींग
भाजपाने तिघांची निवड करताना सामाजिक समावेश आणि विविध भागातील प्रतिनिधित्व या मुद्याला प्राधान्य दिले आहे. सोशल इंजिनिअरिंगचा वापर करत आगामी निवडणुकांसाठी मजबूत संघटना तयार करण्याचा पक्षाचा उद्देश स्पष्ट दिसतो. या नव्या नेमणुकीमुळे रावेर तालुक्यात भाजपाच्या संघटनात्मक मजबुतीला नवी दिशा मिळणार आहे. तालुका पातळीवर भाजपाची तयारी अधिक भक्कम होत असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !