भुसावळ उपविभागातील खाकीतील शिलेदारांचा पुरस्काराने गौरव


Khaki-clad Shiledars of Bhusawal subdivision honored with awards भुसावळ (23 एप्रिल 2025) : कर्तव्याप्रती निष्ठा व ईमानदारी ठेवूत दिलेली जवाबदारी काटेकोरपर्णू पूर्ण करून पोलीस दलाचा नावलौकीक वाढवणार्‍या खाकीतील शिलेदारांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाला कर्मचार्‍यांकडून प्रतिसाद लाभत असून त्यांच्यात या उपक्रमाने कामाप्रती अधिक उत्साह वाढला आहे. मार्च महिन्यासाठी निवड झालेल्या अंमलदारांचा गौरव मंगळवार, 22 एप्रिल रोजी आयोजित गुन्हे आढावा बैठकीत करण्यात आला.

टॉप कॉपचा गौरव
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार्‍या या उपक्रमात, अंमलदारांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे त्यांची निवड केली जाते. निवड झालेल्या अंमलदारांना पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि प्रोत्साहनपर 1000 रुपये रोख बक्षीस देण्यात येते. तसेच, त्यांच्या नावाचा व छायाचित्राचा उल्लेख संबंधित पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागावर ‘टॉप कॉप ऑफ द मंथ’ या पुरस्काराने गौरव केला जातो.

यांची होती उपस्थिती
शहर पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, निरीक्षक महेश गायकवाड, नशिराबादचे सहायक निरीक्षक आसाराम मनोरे, वाहतूक शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक उमेश महाले यांच्यासह भुसावळ उपविभागातील सर्व दुय्यम अधिकारी आणि सुमारे 60 पोलीस अंमलदार उपस्थित होते.

सांघिक भावना वाढीसाठी उपक्रम
पोलीस अंमलदारांना उत्तम सेवा देण्यासाठी प्रेरणा मिळावी, सांघिक भावना वाढीस लागावी आणि जनतेमध्ये पोलीस दलाची प्रतिमा सकारात्मक राहावी या उद्देशाने ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत असल्याचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.

या कर्मचार्‍यांचा झाला गौरव
कुणाल विठ्ठल सोनवणे (भुसावळ शहर) : खुनाच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून आरोपींना अटक

सहायक फौजदार युवराज नागरुत (भुसावळ बाजारपेठ) : 100 कलमी कार्यक्रमांतर्गत पोलीस ठाण्यात स्वखुशीनं कामाची जबाबदारी घेतली

संजय भोई (भुसावळ तालुका) : प्रलंबित गुन्ह्यांचा तातडीने निकाल लावून सहकार्‍यांना मार्गदर्शन

योगेश वराडे (नशिराबाद) : मध्य प्रदेशातून आरोपींना अटक करून गंभीर गुन्ह्याचा तपास पूर्ण केला

अजय भोंबे (शहर वाहतूक शाखा) : मोटार वाहन कायद्यातील 335 प्रकरणांमध्ये 1.97 लाख रुपयांचा दंड वसूल





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !