भुसावळातील मुस्लीम मंचकडून टीआरएफवर कारवाईची मागणी


Muslim forum in Bhusawal demands action against TRF भुसावळ (25 एप्रिल 2025) : मुस्लीम मंच, भुसावळच्या वतीने देखील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. हल्लेखोर संघटना टी.आर.एफ. आणि त्यांच्या समर्थकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत मंचच्या पदाधिकार्‍यांनी शोक व्यक्त केला. भ्याड हल्ला करणारी दहशतवादी संघटना टीआरएफचा निषेध करीत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

प्रसंगी मुस्लीम मंचचे संस्थापक अध्यक्ष साबीर मेंबर, अ‍ॅड.अहतेश्याम मलिक, जुनेद अश्रफखान, शेख अकबर अहमद, शेख रऊफ युसूफ, सलीम गवळी, फिरोज कुरेशी, इर्षाद खान, अकबर चांद गवळी, युनूस मामा, शेख नजर आदी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !