भुसावळच्या चार विद्यार्थ्यांचा इस्रो प्रमुखांकडून सत्कार

गीता मूल्य शिक्षण स्पर्धेत घवघवीत यश


Four students from Bhusawal felicitated by ISRO chief भुसावळ (27 एप्रिल 2025) : इस्कॉनतर्फे घेण्यात आलेल्या गीता मूल्य शिक्षण स्पर्धेत येथील चार विद्यार्थ्यांनी संपूर्ण जिल्ह्यातून अव्वल स्थान पटकावत इस्रो भेट घेतली. यावेळी इस्त्रो चेअरमन एस.सोमनाथ यांच्याहस्ते विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. त्यांना सायकल भेट देण्यात आली. या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये वर्ल्ड स्कूलच्या सानिध्य आणि सम्भावि या भावंडांसह सेंट अलॉयसीसच्या कृष्णा चौधरी व पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या इरा अग्रवाल यांचा समावेश आहे.

शहराच्या नावलौकीकात भर
गीता मूल्य शिक्षण स्पर्धेत घवघवीत यश मिळविल्याने या सर्व विद्यार्थ्यांचा इस्रो चेअरमन एस.सोमनाथ यांच्याहस्ते बंगळुरूत सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे भुसावळ शहराचे लौकीकात भर पडला. विविध शाळांमधून व पालकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सायकल व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागे इस्कॉन भुसावळच्या भूमिकेचे विशेष कौतुक करत त्यांच्या पालकांनी आभार मानले. ही परीक्षा भुसावळमध्ये घेऊन इस्कॉनने विद्यार्थ्यांना संस्कारांसोबत दुर्मिळ संधी दिली, असे मत त्यांनी व्यक्त केले. सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचे मोफत मूल्य शिक्षण खुले करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लागणार आहे. या उपक्रमाचा पुढील टप्पा म्हणून येत्या 3 मे रोजी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत येथील कमल गणपती हॉल येथे 5 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध व्याख्याता डॉ.सुप्रिया खरे या येणार आहे.अधिकाधिक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बालरोगतज्ज्ञ डॉ.रेखा पाटील यांनी केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !