यावल तहसीलदारांचा विविध वाड्या-वस्ती व पाड्यांना महसुल दर्जा मिळवून दिल्याबद्दल पालमंत्र्यांकडून गौरव


The Minister of Agriculture praised the Yaval Tehsildars for providing revenue status to various villages, settlements and padas यावल (27 एप्रिल 2025) : यावल तहसीलदार मोहनमाला नाझीकरसह त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचार्‍यांनी यावल तालुक्यातील विविध वाडी, वस्ती व पाड्यांना महसूल गावाचा दर्जा मिळण्यासाठी प्रशासनाकडे आवश्यक पाठपुरावा केला व त्यांना महसुली दर्जा मिळवून दिल्याने त्यांच्या या कार्याची दखल घेत शुक्रवारी एका कार्यक्रमात जळगावात पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला व उत्कृष्ट तहसील कार्यालय असा पुरस्कार देण्यात आला.

सन्मानपत्र व चषकाने गौश्रव
यावल तहसील कार्यालयास वाडी, वस्ती आणि पाडा यांना महसुली गावाचा दर्जा देणे या कामगिरीबद्दल उत्कृष्ट तहसील कार्यालयाचा यावर्षीचा पुरस्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार राजू मामा भोळे, आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते देण्यात आला. पुरस्कार व गौरव स्विकारतांना तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, मंडळाधिकारी अतुल बडगुजर, तलाठी मनीषा बारेला, कुर्शाद तडवी, अव्वल कारकून निशा चव्हाण यांची उपस्थिती होती.

या सर्वांना सन्मानपत्र आणि चषक देवून गौरविण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील सहा तलाठी यांना चावडी वसुली अंतर्गत साझाची संपूर्ण वसुली पूर्ण करणे आणि तीन लाखांपेक्षा जास्त वसुली करणे यात यावल तालुक्यातील दोन तलाठी भूषण सूर्यवंशी आणि गजानन पाटील यांना देखील विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !