पोलिसांविषयी बेताल वक्तव्य करणार्या आमदार गायकवाडांना भर सभेत तंबी : उपमुख्यमंत्री म्हणाले, वर्दीचा सन्मान राखा !
MLA Gaikwad, who made absurd statements about the police, was reprimanded in a public meeting: Deputy Chief Minister said, maintain the honor of the uniform! न्युज डेस्क । बुलढाणा (28 एप्रिल 2025) : पोलिस दलाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या आमदार गायकवाड यांना भर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तंबी दिली. जिजामाता प्रेक्षागृहात रविवारी आभार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात बोटावर मोजण्याएवढी अपवादात्मक चुकीची माणसं असतात म्हणून संपूर्ण क्षेत्राला दोषी धरता येत नाही. एखाद्या पोलिसाच्या बाबतीत तक्रार असेल, तर थेट माझ्याकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे मांडावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
आमदार गायकवाड यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत, पोलिस दल अकार्यक्षम असल्याची टीका केली होती. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी सभेत गायकवाड यांना समज दिली. मात्र, गायकवाड यांनी खुलासा करत, माझे वक्तव्य संपूर्ण पोलिस दलावर नव्हते, असे स्पष्ट करून माफीही मागितली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्याची दखल घेतल्याने गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.




पोलिस दलावर टीका केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत पोलिस दलाला ‘अकार्यक्षम’ आणि ‘हप्तेखोर’ म्हणत तीव्र शब्दांत टीका केली होती.