रावेर तालुक्यात भीषण अपघात : भुसावळातील पिता-पूत्र ठार


Terrible accident in Raver taluka: Father and son killed in Bhusawal रावेर (28 एप्रिल 2025) :  भरधाव ठार कार व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात भुसावळ शहरातील रहिवासी पिता-पूत्राचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात रावेर तालुक्यातील बोर घाटात सोमवारी रात्री घडला. पिंटू बोडोले (30) व रितीक बोडोले (3) अशी मृत पिता-पूत्रांची नावे आहेत.

पिंटू बोडोले हे त्यांची पत्नी मालुबाई (28) आणि मुले रितीक (3) व आठ महिन्यांचा टेंगुराम यांच्यासह भुसावळकडून पाल येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना सोमवारी रात्रीच्या सुमारास बोर घाटात खेरगावकडून भुसावळच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या एका थार गाडीने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पिंटू आणि त्यांचा लहान मुलगा रितीक यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.





बोडोले कुटुंब हे भुसावळ येथे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणार्‍या या आदिवासी कुटुंबावर अचानक मोठे संकट कोसळले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघाताची माहिती मिळताच भाजपा पक्षाचे रावेर पूर्व तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील आणि बाळा आमोदकर यांनी तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमी मालुबाई बोडोले आणि लहान मुलगा टेंगुराम यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी फैजपूर येथे हलवले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !