तीर्थराज पाटील पुन्हा एकदा नॅशनल मॅच विजयी


Tirtharaj Patil wins the National Match once again भुसावळ (29 एप्रिल 2025) : रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया रोलर रिले स्केटिंग स्केटिंग असोसिएशन महाराष्ट्र आयोजित 43 व्या ऑल इंडिया रोलर रिले चैम्पियनशिप संभाजीनगरात 25 एप्रिल 2025 ते 27 एप्रिल 2025 पर्यंत आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये तामिळनाडू, कर्नाटकसह महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, जळगावसह अन्य भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या नॅशनल लेव्हलच्या स्केटिंग स्पर्धेमध्ये भुसावळ शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी तीर्थराज मंगेश पाटील या विद्यार्थ्याने अंडर ऐट गटामध्ये तीन मॅचमध्ये एक सिल्वर, दोन ब्रांज मेडल मिळवून विजय मिळवला आहे.

तिर्थराजजी यापूर्वी गोवा येथे झालेल्या स्पर्धेत थायलंडमध्ये होणार्‍या स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. या निवडीमध्ये त्याचे कोच सिल्वर लाईन स्पोट्स अ‍ॅकेडमीचे पियुष दाभाडे, दीपेश सोनार यांनी त्याला प्रशिक्षण दिले व मार्गदर्शन केले. त्याला स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे खेळता यावं यासाठी एन.के.नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल अर्चना कोल्हे व स्पोर्ट्स टीचर नम्रता गुरव यांनी त्याला मार्गदर्शन केले.


तो जुन महिन्यात थायलंड देशामध्ये पटाया येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळणार आहे. त्याच्या निवडीबद्दल त्याचे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अमोल जावळे, खासदार स्मिता वाघ, आमदार राजुमामा भोळे यांनी अभिनंदन केले.

तिर्थराज पाटील हा मुळ तळवेल येथिल रहिवासी असून हल्ली शिवशक्ती हुडको कॉलनी भुसावळ येथे राहतो. तो सेवानिवृत्ति मिल्ट्री इंजिनिअरिंग सर्विसचे कर्मचारी सुभाष पाटील यांचा नातू व मंगेश पाटील यांचा मुलगा आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !