साकळीत आज गाव परंपरेनुसार शिवजयंती
Today in Sakali Shiv Jayanti is celebrated according to village tradition यावल (29 एप्रिल 2025) : यावल तालुक्यातील साकळी येथे गाव परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती मंगळवार, 29 रोजी साजरी होणार आहे. उत्सवानिमित्त सर्व राजकीय पदाधिकारी राजकीय मतभेद बाजूला सारून एकत्र आले आहेत. अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी मंगळवार, 29 एप्रिल रोजी गावातील सर्व शिवभक्तांच्या सहकार्याने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
समिती अध्यक्ष भाजपाचे पूर्व विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जि.प.माजी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र (छोटू) सूर्यभान पाटील तर उपाध्यक्ष शारदा विद्या प्रसारक मंडळाचे संचालक शामकांत वसंतराव महाजन आहेत. सचिव लोकनियुक्त सरपंच दीपक, खजिनदार भाजपाच्या वैद्यकीय आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सुनील लक्ष्मण पाटील, सदस्य ग्रामपंचायत सदस्य विनोद लक्ष्मण खेवलकर, ग्रामपंचायत सदस्य मुकेश बोरसे आदींचा समावेश आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भाजपाचे कार्यकर्ते विलास नाना पाटील हे मिरवणुकीत जेसीबीद्वारे एक क्विंटल फुलांचा वर्षाव करतील.

