साकळीच्या शारदा विद्या मंदिराला तीन लाखांचे बक्षीस
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत पटकावला प्रथम क्रमांक
Three lakh rupees reward for Sharda Vidya Mandir in Sakli यावल (29 एप्रिल 2025) : यावल पंचायत समितीच्या सभागॄहात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांक साकळी येथील शारदा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाने पटकावले तर व्दितीय न्यु इंग्लिश स्कुल भालोद तर तृतीय क्रमांक आर्दश विद्यालय, दहिगाव यांनी पटकावला.
साकळी शाळेला तीन लाखांचे बक्षीस
2024-25 शैक्षणिक वर्षांमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत प्रतियोगितेचे शासनातर्फे आयोजन करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री शाळा माझी शाळा सुंदर अंतर्गत शारदा विद्या मंदिर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, साकळीचा प्रथम क्रमांक आला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोमवार, 28 रोजी करण्यात आले. अध्यक्षस्थानी चोपडा मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे होते.

व्यासपीठावर यांची उपस्थिती
व्यासपीठावर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, संस्थाध्यक्षा, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष व सर्व संचालक मंडळास तीन लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह प्रशिस्तीपत्र देवून सन्मानीत करण्यात आले. व्दितीय न्यु इंग्लिश स्कुल भालोद यांना दोन लाखांचा धनादेश सन्मान चिन्ह व प्रशिस्तीपत्र, तर तृतीय क्रमांक आदर्श विद्यालय, दहिगाव यांना एक लाखांचा धनादेश सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आले. या कार्यक्रमास तालुक्यातून द्वितीय व तृतीय क्रमांकाने आलेल्या शाळांचे संस्थाचालक तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधून प्रथम तीन क्रमांकाने आलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, तथा शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्था चालकांकडून कौतुक
विद्यालयाला तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवण्यात संस्थेच्या अध्यक्षा विद्या वसंतराव महाजन, उपाध्यक्ष नानासाहेब सुभाषराव भास्करराव महाजन, कार्याध्यक्ष प्रमोद रमेश सोनवणे, संचालक शामकांत वसंतराव महाजन व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य आर.जे.महाजन, पर्यवेक्षक एस.जे.पवार यांनी मार्गदर्शन केले. आभार एन.पी.पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
