भुसावळात प्रख्यात कवी अभिजीत मुंडे यांचा कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांनी केला सत्कार


भुसावळ (30 एप्रिल 2025) : भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समिती 2025 द्वारे जन्मोत्सवाचे औचित्य साधून शहरातील बियाणी पब्लिक स्कूलच्या प्रांगणात प्रख्यात कवी अभिजीत मुंडे (पुणे) यांचे ‘शंभुगाथा’ या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी भुसावळातील कट्टर शिवसैनिक तथा राजस्थानी विप्र नवयुवक मंडळाचे अध्यक्ष उमाकांत (नमा) शर्मा यांनी सत्कार केला. यावेळी शर्मा यांनी शाल, श्रीफळ व श्री छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली ट्रॉफी, सन्मानचिन्ह देवून मुंडे यांचा सन्मान केला.

प्रसंगी राजस्थानी विप्र समाजाचे अध्यक्ष डॉ.कमलकांत शास्त्री, जगदीश शर्मा, कैलाश उपाध्याय, जयप्रकाश शुक्ला, भूषण जोशी, आदित्य शर्मा, घनश्याम मिश्रा, अनिरुद्ध कुलकर्णी, नितीन शर्मा, संकेत कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी आदी समितीी पदाधिकारी सदस्य व राजस्थानी विप्र समाजाचे मान्यवर व सकल ब्राह्मण समाज उपस्थित होता.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !