उबाठाला खिंडार ; उपजिल्हाप्रमुखासह पदाधिकार्‍यांचा शिंदेच्या सेनेत प्रवेश


Ubathala Khindar ; Office bearers including the Deputy District Chief join Shinde’s army भुसावळ (30 एप्रिल 2025) : उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख, भुसावळ उप तालुकाप्रमुख, वरणगाव उपशहरप्रमुख, ग्राहक स्वसंरक्षण कक्षाचे उपजिल्हा संघटक यांच्यासह, सामाजिक महिला कार्यकर्त्यांसह भुसावळ, जामनेर, यावल येथील 85 कार्यकर्त्यांनी मुंबईत सोमवारी सायंकाळी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शिवसेनेत प्रवेश केला.

यांनी केला प्रवेश
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील उपजिल्हाप्रमुख विलास मुळे, भुसावळ तालुकाप्रमुख सुभाष चौधरी, वरणगाव उपशहरप्रमुख राम शेटे, ग्राहक संरक्षण कक्षाचे उपजिल्हा संघटक नितीन देशमुख, काहूरखेडचे सरपंच पती विनोद पाटील, वरणगावच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या सविता माळी, कलाबाई माळी, उर्मिला चौधरी, रूनल वाणी, भुसावळच्या प्रतिभा सूर्यवंशी यांच्यासह जामनेर, यावल, भुसावळ असे सर्व रावेर विभागातून जवळपास 85 कार्यकर्त्यांनी मुंबईला शिवसेनेत जल्लोषात मशाल सोडून हातात धनुष्यबाण घेतला.

यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी, यावलचे तालुकाप्रमुख राजेंद्र काठोके, वरणगाव शहर संघटक दुर्गेश बेदरकर, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांच्यासह आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !