भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात उपशिक्षिका यु.एस.गड्डम यांना निरोप
Farewell to Assistant Teacher U.S. Gaddam at K. Narkhede School in Bhusawal भुसावळ (30 एप्रिल 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मंगळवार, 29 रोजी सकाळी 11 वाजता विद्यालयाच्या उपशिक्षिका यु.एस.गड्डम या नियमानुसार 31 डिसेंबर 2024 रोजी 58 वर्षांनंतर सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील होते. कार्यक्रमास संस्थेचे ऑ.जॉ.सेक्रेटरी प्रमोद नेमाडे उपस्थित होते.
प्रास्ताविक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे यांनी केले. यु.एस.गड्डम व त्यांचे पती विवेकानंद नरडेवार यांचा सत्कार संस्थेमार्फत, विद्यालयातर्फे स्टाफतर्फे तसेच के.एन. सी.टी.आय.तर्फे तसेच गड्डम यांच्या कन्येतर्फे करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
संस्थाध्यक्ष मकरंद नारखेडे यांचा संदेश एस.डी.वासकर यांनी वाचून दाखवला. शिक्षकांतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात मनोज कुलकर्णी यांनी गत आठवणींना उजाळा दिला. उपाध्यक्ष किशोर नारखेडे, चेअरमन श्रीनिवास नारखेडे यांनी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. पी.व्ही.पाटील यांनी गड्डम यांचा निर्भीडपणा व स्पष्ट वक्तेपणाचा उल्लेख केला. सूत्रसंचालन एन.जे.खाचणे यांनी केले तर आभार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका संगीता अडकमोल यांनी मानले. विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी.किरंगे, प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षिका एस.ए.अडकमोल, एस.एल.राणे, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, एस.पी.पाठक, सर्व संगणक विभाग कर्मचारी, विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.


