भुसावळातील गटसाधन केंद्रात गुणवंत शिक्षकांचा गौरव
Qualified teachers honored at the Group Learning Center in Bhusawal भुसावळ (30 एप्रिल 2025) : शिक्षण क्षेत्रामध्ये विविध उपक्रमांतर्गत तालुक्यातील शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव गटसाधन केंद्रामध्ये करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, बी.डी.धाडी, विषय तज्ञ शिक्षक सचिन पाटील, संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
या पदाधिकार्यांचा सत्कार
केंद्रप्रमुख पदावरून शिक्षण विस्तार अधिकारीपदी निवड झालेल्या आशिक शेख तर राज्य मुख्याध्यापक संघातर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत एस.एस.अहिरे (नेहरू विद्यामंदिर, तळवेल), राष्ट्रीय स्तरावर विज्ञान क्षेत्रातील कार्य करणारे सुनील वानखेडे (महात्मा गांधी विद्यालय, वरणगाव), सेवा आम्ही कायदा अंतर्गत उत्कृष्ट कार्य केलेले मुख्याध्यापक वाय.एन.झोपे (के.नारखेडे विद्यालय, भुसावळ), व्हिडिओ निर्मितीमध्ये बक्षीस पात्र ठरलेले भारती अवचारे (जि.प.शाळा, सिद्धेश्वरनगर), निशा पाटील (जि.प.शाळा, गोजोरा), वंदना पाटील (जि.प.शाळा, सिद्धेश्वरनगर), निपुण भारत अंतर्गत उत्कृष्ट कार्य केलेले शिक्षक संजय गायकवाड, भुसावळ प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीत निवडून आलेले प्रदीप सोनवणे, समाधान जाधव, मीरा जंगले, विक्रांत चौधरी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना किशोर वायकोळे म्हणाले की, भुसावळ तालुक्यातील शिक्षकांचे उत्कृष्ट कार्य आहे. यामुळेच जिल्हा राज्य स्तरावर त्यांची निवड केली जाते यामुळे तालुक्याचे नाव मोठे होते. सूत्रसंचालन सचिन पाटील तर आभार समाधान जाधव यांनी मानले.


