पूजा खेडकर स्पष्टच म्हणाली : आईचे नाव लावणे कधीपासून गुन्हा ?


Pooja Khedkar clearly said: Since when is it a crime to use one’s mother’s name? मुंबई (2 मे 2025) : माध्यमांत माझ्याविषयी चुकीची माहिती गेली आहे. मी नाव बदलले, जास्तीचे अटेम्प्ट दिले, दिव्यांग प्रमाणपत्र खोटे दिले हे सर्वकाही खोटे असून आईचे नाव लावणे कधीपासून गुन्हा ठरला? असा सवाल पूजा खेडकरने केला.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी यूपीएससीने पूजा खेडकर विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ती पसार होती. त्यानंतर तिला अटकेपासून संरक्षण मिळाले. त्यानंतर शुक्रवारी ती जवळपास 9 महिन्यांनंतर दिल्ली पोलिसांपुढे चौकशीसाठी हजर झाली. यावेळी माध्यमांना सामोरे जाताना तिने स्वतःचा जोरदार बचाव करण्याचा प्रयत्न केला.

पूजा खेडकर पत्रकारांशी बोलताना म्हणाली, मी तपास यंत्रणेला मदत करण्यास तयार आहे. प्रत्येकवेळी मी तसे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले आहे. सुप्रीम कोर्टातही मी ते दाखल केले होते. त्यानुसार, आज मी माझा जबाब नोंदवणार आहे. त्यानंतर या प्रकरणाची कारवाई पुढे सरकेल. क्राईम ब्रँचलाही मी मेल केला आहे. मी स्टेटमेंट देण्यासाठी तयार आहे, मला चौकशीसाठी फोन करा, असे मी त्यांना सांगितले आहे. माझ्याविषयी मीडियात चुकीची माहिती गेली आहे. मी नाव बदलले, जास्तीचे अटेम्प्ट दिले, दिव्यांग प्रमाणपत्र बोगस दिले, हे सर्वकाही खोटे आहे.

पूजा खेडकर पुढे म्हणाली, आईचे नाव लावणे हा कधीपासून गुन्हा झाला? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही आईचे नाव लावतात. मी केव्हाही वेगवेगळी नावे दिली नाही. दिलीप व दिलीपराव या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत का? मीडियाने काहीतरी ट्विस्ट दाखवण्याचा प्रयत्न केला. कुठलेही दिव्यांग प्रमाणपत्र सबमीट केले तरी यूपीएससी व डीओपीपी ते स्वीकारत नाहीत. त्यांचे स्वतंत्र 12 डॉक्टरांचे एक पॅनेल असते. ते पुन्हा तपासणी करतात.

3 वर्षांत माझी सहावेळा तपासणी झाली. एम्स रुग्णालयाच्या पॅनेलने दिलेले प्रमाणपत्र चुकीचे असू शकत नाही. माझे दिव्यांग प्रमाणपत्र खोटे आहे किंवा ओबीसी प्रमाणपत्र खोटे आहे असे यूपीएससीने कुठेही म्हटले नाही, असा दावाही पूजा खेडकरने यावेळी बोलताना केला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !