नाशिक पोलिसांच्या हातातून पसार झालेला ‘क्रिश’ अखेर सापडला


‘Krish’, who escaped from the hands of Nashik police, has finally been found नाशिक (2 मे 2025) : 19 वर्षीय संशयीत भद्रकाली पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला मात्र नंतर या आरोपीला पकडण्यात यंत्रणेला यश आले. क्रिश किरण शिंदे (19, रा.54 क्वार्टर, नानावली) या आरोपीचे नाव आहे

19 वर्षीय क्रिश हा पोलिसाच्या हाताला झटका देवून पसार झाला होता मात्र याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच पोलिसांवर टिकेची झोड उठली होती.

पोलीस ठाण्याच्या बाहेर पळून जाणार्‍या आरोपीची स्कुटीसह एक जण वाट बघत होता. आरोपीला पळून जाण्यास मदत करणार्‍याला शोधपथकाने इगतपुरी भागातील जंगलातून 24 तासांत बेड्या ठोकल्या.

तपोवन रोडवरील जयशंकर चौकात फिर्यादी अमोल अरुण हिरवे (40, रा. अनुसयानगर) यांच्यावर कोयत्याने तिघांनी हल्ला केला होता. गुन्ह्यात जुने नाशिकमधील संशयित क्रिश शिंदे याच्यासह अल्पवयीन गुन्हेगाराला ताब्यात घेतले होते. तपासाकरिता पोलिसांनी सुरक्षा कोठडीतून बाहेर आणल्यानंतर शिंदे पळाला होता. बाहेर दुचाकी घेऊन उभा असलेला त्याचा मित्र किरण युवराज परदेशी (रा. कथडा) यालाही पोलिसांनी अटक केली.

दुचाकीने परदेशी याने शिंदे यास निलगिरी बागेत मंगळवारी रात्री नेऊन सोडले होते. तेथून त्याने इगतपुरी गाठले. पोलिसांनी इगतपुरी भागातील जंगलाच्या परिसरातून त्यास ताब्यात घेतले.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !