आधी केली मैत्री नंतर ठेवले शरीर संबंध मात्र नंतर मैत्रिणीलाच पळवत केले लग्न


First they became friends then they had sex, but later they married their girlfriend by running her away कोल्हापूर (2 मे 2025) : लग्नाचे आमिष दाखवत प्रेमाच्या आणाभाका घेत एका मैत्रिणीशी शरीरसंबंध ठेवले मात्र काही दिवसांत तिला सोडून तिच्याच मैत्रिणीसोबत पळून जाऊन लग्न केले. हा प्रकार लक्षात येताच पहिल्या प्रेयसीने कोडोली पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

लग्न होत नसल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडणार्‍या तरुणांची संख्या राज्यभर वाढत असताना कारंडेवाडीच्या ओंकार प्रधान या पठ्ठ्याच्या आयुष्यात मात्र दोन-दोन तरुणी आल्या. जेमतेम 12 वीपर्यंत शिक्षण झालेल्या ओंकारने पुण्यातील कंपनीत काम करतो. इन्स्टाग्रामवरून मुंबईतील एका तरुणीशी त्याची मैत्री झाली. प्रेमाच्या आणाभाका घेऊन तिला संसाराची स्वप्ने दाखवली. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. गर्भधारणा झाल्यानंतर गोळ्या देऊन गर्भपात केला. दरम्यानच्या काळात त्याने प्रेयसीच्या मैत्रिणीशी सूत जुळवले व आठवड्यापूर्वी पळून जाऊन लग्नही केले.

हा प्रकार लक्षात येताच पहिल्या प्रेयसीने करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन सगळा प्रकार अधिकार्‍यांना सांगितला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !