जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप : पवारांच्या गटातील पाच माजी आमदार उद्या अजितदादांच्या पक्षात प्रवेश करणार !


Political earthquake in Jalgaon district : Five former MLAs from Pawar’s group will join Ajit’s party tomorrow! न्युज डेस्क । जळगाव (2 मे 2025) : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आगामी काही महिन्यात होत आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे पाच माजी आमदार 3 मे रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे.

मुंबईत शनिवार, 3 मे रोजी त्यांचा पक्ष प्रवेश होईल त्यामुळे राजकीय समीकरणे बदलणार असून संघटनात्मक ताकद वाढवायला अजित पवारांना हा बुस्टर डोस ठरू शकतो. आधीच अजित पवारांसोबत गेलेल्या काही पदाधिकार्‍यांच्या विरोधामुळे माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश घेता आला नव्हता. मात्र, आता देवकर यांच्यासाठी मार्ग मोकळा झाला होता. त्यांच्या पाठोपाठ माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार दिलीप वाघ (पाचोरा), माजी आमदार कैलास पाटील (चोपडा) आणि माजी विधान परिषद सदस्य दिलीप सोनवणे यांनीही सोबत जाण्याची तयारी दर्शवली.

जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तिलोत्तमा पाटील आणि पक्षाचे प्रवक्ते वाल्मीक पाटील यांनीही अजित पवारांच्या पक्षात प्रवेश घेण्याची तयारी केल्यामुळे या सर्व नेत्यांचा शनिवारी मुंबईत पक्ष कार्यालयात अधिकृतपणे प्रवेश होणार आहे. मंगळवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. बँकेचे अध्यक्ष संजय पवार हेही यावेळी उपस्थित होते.

या दिग्गजांच्या प्रवेशामुळे अजित पवार यांची जळगाव जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद वाढणार आहे. येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांच्या पक्षाला या ताकदीचा लाभ होईल. माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील हे आतापर्यंत अजित पवारांच्या पक्षात एकमेव बडे नेते होते. आता त्यांचे महत्त्व काही प्रमाणात कमी होईल

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !