काय सांगता ! सोन्याच्या भावात घसरण : जाणून घ्या नेमकी बातमी


What do you say! Gold price falls : Know the exact news न्युज डेस्क । जळगाव (2 मे 2025) : अक्षय्य तृतीयाच्या सलग तिसर्‍या दिवशी सोनं-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे.

गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार शुक्रवार, 2 मे 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 22 रुपयांनी कमी झाला आणि तो प्रति ग्रॅम 9,510 रुपयांवर आला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर आता 8,755 रुपये प्रति ग्रॅम झाला आहे जो मागील दिवसापेक्षा 20 रुपयांनी कमी आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 16 रुपयांनी कमी झाला आहे. 18 कॅरेट सोन्यासाठी 7,164 रुपये प्रति ग्रॅम मोजावे लागतील.

24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 510 रुपये, 22 कॅरेट सोन्याची किंमत 87 हजार 550 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 71 हजार 640 रुपये आहे. मागील दिवसाच्या तुलनेत प्रत्येक कॅरेट सोन्याच्या दरामध्ये काही प्रमाणात घसरण झाली आहे.सोन्याचे दर जरी कमी झाले असले तरी देखील चांदीचे दर मात्र स्थिर राहिले आहेत.

शुक्रवार, 2 मे रोजी भारतात 1 किलो चांदीचा भाव 98 हजार रुपये आहे. ज्यामध्ये कालच्या दिवसापेक्षा कोणताही बदल झाला नाही.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !