भुसावळातील प्रा.डॉ.दयाघन राणे यांची नशाबंदी मंडळाच्या विभागीय संघटक म्हणून नियुक्ती


Prof. Dr. Dayaghan Rane भुसावळ (3 मे 2025) :  शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील भौतीकशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.दयाघन सुपडू राणे यांची नुकतीच नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या विभागीय संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. यानिमित्ताने अलिबाग येथे झालेल्या राज्यस्तरीय विभागीय संघटकांच्या विशेष सहविचार सभेत त्यांचे स्वागत करण्यात आले.

संस्थेतर्फे प्रबोधनाचे कार्य
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ही राज्यशासनाची मान्यताप्राप्त अनुदानित संस्था (एनजीओ) आहे. ही संस्था 1958 सालापासून मतपरिवर्तनातून व्यसनमुक्ती ह्या माध्यमातून राज्यभर व्यसनमुक्ती साठी प्रचार, प्रसार आणि प्रबोधनाचे कार्य करते. प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी अनेक वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून भुसावळ शहर ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्षेत्रात अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्याआधी व्यसनमुक्ती प्रकल्पांचा ही सहभाग होता. राज्यस्तरीय बैठकीत प्रा.राणे यांची नाशिक विभागीय संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली. नाशिक विभाग संघटक म्हणून कार्य करीत असताना प्रा.डॉ.दयाघन राणे यांच्याकडे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यादेवी नगर जिल्ह्यांमधील व्यसनमुक्ती कार्याची जबाबदारी असेल. त्यांच्या ह्या नियुक्ती बद्दल नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्य कार्यालयाचे मुख्य संघटक अमोल मडामे, सरचिटणीस वर्षा विद्या विलास, चिटणीस चंद्रकांत चौधरी यांच्यासह राज्य कार्यकारिणीने अभिनंदन केले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !