भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात स्व.अण्णासाहेब पी.आर.पाटील यांना पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन


Tributes paid to late Annasaheb P.R. Patil on his death anniversary at K. Narkhede School in Bhusawal भुसावळ (3 मे 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ संस्थेचे माजी शालेय समिती चेअरमन आणि के.नारखेडे कॉम्प्युटर टेक्नोलॉजी संस्थेचे माजी सेक्रेटरी स्व.अण्णासाहेब पी.आर.पाटील यांना त्यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे यांच्याहस्ते अण्णासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि अभिवादन करण्यात आले.

विद्यालयाच्या पर्यवेक्षिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक सुनील राणे, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, एस.पी.पाठक, संगणक विभागातील सर्व कर्मचारी व विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !