रा.धो.माध्यमिक विद्यालयाला ललवाणी परिवाराकडून देणगी
Donation from the Lalwani family to the National Secondary School भुसावळ (3 मे 2025) : भुसावळ तालुक्यातील कुर्हेपानाचे येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचालित रा.धो. माध्यमिक विद्यालयात कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व ललवाणी फौंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.डी.एम ललवाणी यांच्यातर्फे नातु मनीत व आई स्व.ताराबाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन विद्यालयातील उत्कृष्ट विद्यार्थ्यास मनीत ललवाणी पारितोषिक व उत्कृष्ट विद्यार्थिनीस स्व.ताराबाई ललवाणी पारितोषिक देण्यासाठी रुपये 11 हजारांची देणगी स्वरूपात भेट देण्यात आली.
ही देणगीची रक्कम कायमस्वरूपी ठेव ठेवण्यात येऊन त्यातील व्याजातून पारितोषिक देण्यात येतील. याप्रसंगी चेअरमन अप्पासाहेब एकनाथजी बडगुजर, माजी मुख्याध्यापक आर.व्ही.गवळी, मुख्याध्यापक एस.पी.चौधरी, पर्यवेक्षक एस.डी.वाघ उपस्थित होते. माजी मुख्याध्यापक आर.व्ही.गवळी यांनी पारीतोषीकासाठी चालना दिली. चेअरमन एकनाथजी बडगुजर यांनी उपक्रमाचे कौतुक केले.


