भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील एस.ई.ए.संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात
Anniversary of SEA Association at Bhusawal Thermal Power Plant celebrated with enthusiasm भुसावळ (3 मे 2025) : भुसावळ तालुक्यातील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील एसईए संघटनेचा 53 वा वर्धापन दिन दीपनगर येथे साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे होते. यावेळी गणेश मंदिरासमोर असलेल्या संघटनेच्या फलकाचे पूजन प्रमुख पाहुणे यांच्याहस्ते करण्यात आले. वीज निर्मिती केंद्रातील उपमुख्य अभियंता रवींद्र सोनकुसरे, उपमुख्य अभियंता राजेंद्र कुंभार, अधीक्षक अभियंता सुनील पांठरपट्टे, संतोष देशपांडे, संतोष चंद्रमणी, कांबळे उपस्थित होते.
प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष अभियंता विशाल आढाव यांनी केले. सहसचिव स्थापत्य अभियंता अमित मुर्तडक यांनी आभार मानले.कार्यकारी अभियंता महेंद्र पोचलोरे, चेतन आंबटकर, मोहित चव्हाण, सारंग देशपांडे, एसईए उपाध्यक्ष अभियंता संजय पाटील, एसइए निर्मिती सचिव समन्वय आशुतोष लांबोळे, सहसचिव अभियंता विशाल आढाव, सहसचिव अभियंता अमित मुर्तडक, अभियंता भावेश सोनजे, श्रीकांत कोंढार, विनायक बोराटे, संदीप फापाळे, शंकर नागरे, संदीप पाथरूट, जितेंद्र नाईक, रितेश चौधरी, चेतन कविश्वर, शंकर नागरे, तंजिल शेख, चेतना झोपे, अनुजा चौधरी, सोहम भुतेकर, विकास वाणी नंदकिशोर पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.


