भुसावळातील डॉ.प्रदीप साखरे खान्देश आयकॉन पुरस्काराने सन्मानीत
Dr. Pradeep Sakhre from Bhusawal honored with Khandesh Icon Award भुसावळ (3 मे 2025) : भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक तथा शॉट पीच क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ.प्रदीप रवींद्र साखरे यांनी सामाजिक, पर्यावरण, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात आजपर्यंतच्या केलेल्या कार्याबद्दल जळगावात खान्देश आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सामाजिक कार्याची दखल घेत पुरस्कार
साखरे यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर केलेले क्रीडा कार्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर वेतनाम, थायलंड ,चायना, मलेशिया, लावोस, इंडोनेशिया मंगोलिया, नेपाळ अशा विविध देशांमध्ये एशियन गेम, बीच एशियन गेम, इंडोअर एशियन गेम, वर्ल्ड चॅम्पियनशिप, अशा विविध स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व तसेच प्रशिक्षित म्हणून काम केलेले आहे. आठ मार्च रोजी जन्मलेल्या बालिकांचा व त्यांच्या मताचे त्यांचा सन्मान करणे तसेच पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून वृक्षारोपण करणे यासह विविध कार्याची दखल घेत सप्तरंग मराठी चैनल व सूर्या फाउंडेशन यांच्याद्वारा व सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते अभिजीत खांडकेकर, आमदार अमोल पाटील, आमदार राजुमामा भोळे, अॅड.संजय राणे, किरण पातोंडेकर आदींच्या उपस्थितीत खान्देश आयकॉन पुरस्काराने साखरे यांचा गौरव करण्यात आला.


