बैल धुताना पाण्यात बुडाल्याने मामासह भाच्याचा दुर्दैवी मृत्यू

सोयगाव तालुक्यातील घटना : 13 वर्षीय बालकाला वाचवण्यात यश


बाळू शिंदे
Uncle and nephew die after drowning while washing bull सोयगाव (3 मे 2025) :बैलाला तलावात अंघोळीसाठी गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने मामासह भाच्याचा बुडून मृत्यू झाला तर सुदैवाने 18 वर्षीय मुलीला वाचवण्यात यश आले. ही धक्कादायक घटना सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांड्यावर घडली. अकिल शकील पठाण (18, नांदगांव तांडा, ता.सोयगाव) व रेहान भिकन शेख (15, रा.सातगाव डोंगरी, ता.पाचोरा) अशी मृतांची नावे आहे तर साकिब कलंदर पठाण (13, घटनांदरा, ता.सिल्लोड) हा मात्र पाण्यातून बुडालेला असताना त्यास वाचविण्यात एका मुलीला यश आले.

मामाकडे आलेल्या भाच्याचा दुर्दैवी मृत्यू
मयत रेहान भिकन शेख हा नांदगाव तांडा येथे मामा शकील पठाण यांच्याकडे सुटीत आला होता तर वाचलेला सकीब कलंदर पठाण हा त्याचा बहिणीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत नांदगाव तांडा येथे आला होता. शनिवारी हे तिघेही बैल धुण्यासाठी नांदगाव तांडा साठवण तलावाजवळ गेले असता त्या तिघांनाही खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही पाण्यात बुडाले.

18 वर्षीय तरुणीच्या धाडसाने एक जण बचावला
ही बाब साठवण तलावात कपडे धुणार्‍या महिलांच्या लक्षात येताच त्यातील मनीषा कैलास बागुल या 18 वर्षीय मुलीने साठवण तलावात उडी घेऊन या तिघांना वाचविण्यासाठी तब्बल 23 मिनिटे पाण्यात झुंज दिल्यानंतर साकीब कलंदर पठाण हा 13 वर्षीय बालकाला वाचवण्यात यश आले.

ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत अकिल पठाण व रेहान शेख यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले व शवविच्छेदनासाठी पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात पाठविले. पाण्यातून वाचलेल्या साकीब पठाणवर पाचोरा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, सायंकाळी उशिरा महसूलच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !