म्हशीकोठा शिवारात आग : पाच लाखांचे नुकसान


Fire in Mhasikotha Shivara: Loss of five lakhs सोयगाव (4 मे 2025) : सोयगाव तालुक्यातील म्हशीकोठा शिवारातील शेतात अचानक आग लागून आगीत शेतात कापणी करून ठेवलेला मक्यासह ठिबक संच, पाईप लाईन आदी वस्तू जळून खाक झाल्या. ही घटना शुक्रवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये शेतकर्‍याचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे महसूल ने शनिवारी केलेल्या पंचनाम्यात नमूद आहे.

काय घडले नेमके
म्हशीकोठा शिवारात गट क्रमांक-64 मध्ये शेतकरी विजय गणसिंग सूर्यवंशी यांच्या शेतात रब्बी हंगामातील मका पिके कापणी करून ठेवली होती परंतु शुक्रवारी रात्री अचानक आग लागून या आगीत एक हेक्टर 33 आर जमिनीतील मका, चारा व ठिबक सिंचन सह पाईपलाईन जळून खाक झाली. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला.

दरम्यान महसूल विभागाने शनिवारी घटनेचा पंचनामा केला. खरिपाच्या हंगामात नुकसान झाल्याने शेतकरी विजय सूर्यवंशी यांनी रब्बी हंगामात एक हेक्टर 33 आर क्षेत्रात मक्याची पेरणी केली. मका कापणी करून शेतात ठेवल्यावर एक दोन दिवसात ते काढणी करणार होते परंतु आगीने अचानक घात केल्यामुळे त्यांचे रब्बी हंगामातील मक्या सह चारा पाईप, ठिबक आदींचे एकूण पाच लाखांचे नुकसान झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !