विद्यार्थ्यांनो लक्ष द्या : प्रतीक्षा संपली : उद्या बारावीचा निकाल
Attention students: The wait is over: Class 12 results tomorrow मुंबई (4 मे 2025) : बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याबाबत अपडेट माहिती समोर आली आहे. सोमवार, 5 मे रोजी बोर्डाच्या संकेत स्थळावर दुपारी एक वाजता परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.
दुपारी एक वाजेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.
या वर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. त्यासाठीची प्रात्यक्षिक परीक्षा त्यापूर्वी 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 दरम्यान घेण्यात आल्या होत्या. परीक्षेसाठी सुमारे 8.1 लाख विद्यार्थी, 6.9 लाख विद्यार्थिनी आणि 37 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली. आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन पाहता येणार आहे. त्याआधी बोर्डाची पत्रकार परिषद होणार असून त्यामध्ये विस्तृत माहिती देण्यात येणार आहे.
या संकेतस्थळांवर तपासू शकता निकाल
mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in


