निंभोरा येथील माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांचा कन्येसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
Former Deputy Sarpanch of Nimbhora Vivek Thackeray joins NCP along with his daughter निंभोरा, ता.रावेर (5 मे 2025) : ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विवेक ठाकरे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आपल्या वडिलांसमवेत ग्रामगौरव प्रकाशन संस्थेच्या युवा उद्योजिका कु.भाग्यश्री ठाकरे यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजित पवार यांनी दोघांचे पक्षात स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याचे कृषिमंत्री ना.माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री ना.इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी तथा वरिष्ठ उपाध्यक्ष माजी मंत्री अनिलदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रावेर लोकसभा अध्यक्ष उमेशभाऊ नेमाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य व पक्षाचे राज्य सरचिटणीस रवींद्रभाऊ नाना पाटील, जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष संजय भाऊसाहेब पवार,प्रदेश प्रवक्ते योगेशभाऊ देसले यांच्या मार्गदर्शनाखाली 3 मे रोजी मुंबई येथील के.सी कॉलेज येथे हा प्रवेश सोहळा झाला.जिल्ह्याचे माजी मंत्री डॉ.सतीशअण्णा पाटील व गुलाबराव देवकर आप्पा यांच्या मुख्य प्रवेश सोहळ्याचा हा कार्यक्रम होता.
विवेक ठाकरे हे जळगाव जिल्ह्यासह राज्यभर पत्रकारीता,राजकीय व सामाजिक क्षेत्रात विविध स्तरावर कार्यरत आहेत. काँग्रेसच्या पंचायतराज विभागाचे जळगाव जिल्ह्याचे माजी अध्यक्ष व युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून तत्कालीन कालखंडात त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत.श्री. ठाकरे हे महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे माजी प्रदेशाध्यक्ष तसेच महाराष्ट्र सकल धोबी समाजाच्या वतीने सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या आरक्षण कृती समितीच्या
लढ्याचे अध्यक्ष सुद्धा आहेत.
राज्यस्तरावर सक्रिय बारा बलुतेदार व ओबीसी समाज चळवळीचे नेते आणि अखिल भारतीय सरपंच परिषदेचे राज्य सरचिटणीस म्हणून सुद्धा काम पाहत आहेत.विधानसभेचे माजी अध्यक्ष स्व.बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी स्थापन केलेल्या विविध शैक्षणिक संस्थांच्या मधुस्नेह परिवाराचे कृषी व ग्रामविकास विभागाचे समन्वयक म्हणून सुद्धा श्री. ठाकरे यांच्यावर जबाबदारी आहे.
बहुजन हिताच्या पुरोगामी विचाराची संगत केली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुरोगामी विचार व महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते मुहूर्तमेढ झालेला राज्याचा मंगलकलश अधिक समृद्ध करण्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे धोरण लक्षात घेऊन बहुजन समाजाच्या तळागाळातील लोकांना तसेच रावेर तालुक्यातील आमचे मुळगाव निंभोरा व परिसरात विकास योजनांना चालना मिळावी म्हणून सामाजिक व राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून न्याय देण्याच्या भूमिकेसाठी प्रवेश केल्याचे विवेक ठाकरे व कु.भाग्यश्री ठाकरे यांनी कळविले आहे.


