बारावी परीक्षेत टक्केवारीत अपेक्षाभंग : एरंडोलसह ममुराबादच्या विद्यार्थ्यांनी उचचले टोकाचे पाऊल


Students of Mamurabad including Erandol took a bold step जळगाव (5 मे 2025) : बारावी परीक्षेचा सोमवारी दुपारी एक वाजता निकाल जाहीर झाला मात्र परीक्षेत तयारी करूनही अपेक्षित मार्क (टक्केवारी) न मिळाल्याने जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. पहिल्या घटनेत ममुराबादच्या विद्यार्थ्याने तर दुसर्‍या घटनेत एरंडोलच्या विद्यार्थ्याने पाचोरा शहरात बहिणीकडे आत्महत्या केली.

ममुराबादच्या तरुणाची आत्महत्या
ममुराबाद गावात एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घराच्या वरच्या (दुसर्‍या) मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, 5 मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. ऋषिकेश दिनेश पाटील (17) असे मृताचे नाव आहे.

ऋषिकेश हा जळगाव, हा तरुण आपल्या आई-वडील, आजी आणि मोठ्या भावासोबत ममुराबाद येथे वास्तव्याला होता. त्याने विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. सोमवारी दुपारी एक वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या निकालात ऋषिकेश पाटील याला 49 टक्के गुण मिळाले. मिळालेले गुण त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने त्याला तीव्र नैराश्य आला. या नैराश्यातूनच त्याने राहत्या घराच्या दुसर्‍या मजल्यावर कोणी नसताना गळफास घेऊन आपली जीवनयात्रा अकालीच संपवली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना आईच्या लक्षात आली

ही दुर्देवी घटना घडल्यानंतर ऋषिकेशच्या आई-वडिलांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात जो आक्रोश केला, तो काळीज चिरणारा होता. त्यांच्या दुःखाने उपस्थितांचे डोळे पाणावले. ऋषिकेशचा मोठा भाऊ फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

एरंडोलच्या विद्यार्थ्याची पाचोर्‍यात बहिणीकडे आत्महत्या
दुसर्‍या घटनेत पाचोरा शहरातील आपल्या बहिणीकडे आलेल्या एरंडोलच्या विद्यार्थ्याने गळफास घेतला. भावेश प्रकाश महाजन (19, एरंडोल) असे मृताचे नाव आहे. भावेश हा एरंडोल येथे महाविद्यालय शिक्षण घेत होता.

भावेशने एरंडोल येथे परीक्षा दिली व तो गेल्या 15 दिवसांपासून पाचोरा येथील भडगाव रोडवरील राजीव गांधी कॉलनी (शक्तीधाम जवळ) राहत असलेल्या बहिणीकडे आला. 4 मे रोजी सायंकाळी भावेश याची बहिण व पाहुणे हे पुणे येथे लग्न समारंभासाठी गेले होते. भावेश हा 5 मे रोजी सकाळी 10 वाजता पाचोरा शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील दुसर्‍या पाहुण्यांच्या दुकानावर गेला होता.

दुपारी 12 वाजता भावेश हा दुकान बंद करुन राजीव गांधी कॉलनी येथील बहिणीच्या घरी गेला. दुपारी एक वाजता निकाल जाहिर झाला. यात भावेश यास 42 टक्के गुण मिळाले. भावेशने नैराश्यातुन बहिणीच्या राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

शहरातच वास्तव्यास असलेल्या दुसर्‍या बहिणीकडे भावेश हा जेवणासाठी येणार होता मात्र दोन वाजूनही तो न आणल्याने व फोन उचलत नसल्याने खातरजमा केली असता घडला प्रकार समोर आला. पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विद्यार्थ्यांनो टोकाचे पाऊल उचलू नका
बारावी परीक्षेत अल्प मार्क मिळाले म्हणजे खचण्याचे कुठलेही कारण नाही. विद्यार्थी पुन्हा रिचेकचा फार्म भरू शकतात त्यामुळे आई-वडीलांसाठी तुम्ही आशेचा किरण असल्याने कुणीही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने केले आहे.

विद्यार्थ्यांनो खचून जाऊ नका : निलेश गोरे
विद्यार्थ्यांनो, तुमचं मूल्य हे गुणांपुरतं मर्यादित नाही. अपयश आले तरी तेच आयुष्याचं शेवटचं पान नसतं. प्रत्येक अपयशात नवीन सुरुवातीची बीजं दडलेली असतात. तुमचे स्वप्नं, तुमचा प्रयत्न आणि तुमचा आत्मविश्वास—हीच खरी उर्जा आहे, असे भुसावळ शहरातील समुपदेशक निलेश गोरे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना म्हणाले.

बारावीच्या निकालानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याची घटना अतिशय दुःखद आणि विचार करायला लावणारी आहे. यश वा अपयश हे जीवनाचे अंतिम सत्य नाही, तर केवळ एक टप्पा आहे. पालक, शिक्षक आणि समाजाने मिळालेल्या गुणांच्या पलीकडे पाहून मुलांच्या भावना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. अपयश हा पुढच्या यशाचा पाया असतो. विद्यार्थ्यांनीही लक्षात ठेवावे की, तुमचे आयुष्य गुणपत्रकाच्या आकड्यांपेक्षा फार मोठे आणि मौल्यवान आहे. आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य मार्गदर्शनाने प्रत्येक अपयशातून पुन्हा उभे राहता येते. ‘जीवन जगण्यासाठी आहे — स्पर्धा करण्यासाठी नव्हे’, असेही निलेश गोरे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !