जळगाव शहरातील तरुणाच्या खून प्रकरणी गुन्हे शाखेकडून चौघे ताब्यात


Four arrested by Crime Branch in connection with murder of youth in Jalgaon city जळगाव (5 मे 2025) : शहरातील अशोकनगर भागातील रहिवासी आकाश पंडित भावसार (वय 27) या तरुणाचा राष्ट्रीय महामार्गावर ए वन भरीत सेंटरजवळ धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणात जळगाव स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका आरोपीला अटक केली असून अन्य तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला आकाशची आई कोकिळाबाई भावसार यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजय मंगेश मोरे यांच्यासह चारअनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अजय मंगेश मोरे (वय 28, कासमवाडी, जळगाव) सह 3 अल्पवयीन आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. एक आरोपी कुणाल उर्फ सोनू चौधरी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !