शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भुसावळातील विराट कोळीला कांस्यपदक
Virat Koli from Bhusawal wins bronze medal in National School Boxing Championship भुसावळ (6 मे 2025) : शहरातील छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमीचा उत्कृष्ट बॉक्सर विराट कोळी याने दिल्लीतील नोएडात सुरू असलेल्या 68 व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य पदक पटकावले. 14 वर्ष आतील 28 ते 30 या वजनी गटामध्ये अति उत्कृष्ट बॉक्सिंग खेळाचे त्याने प्रदर्शन केले. विराट कोळीने पहिल्या लढतीत गुजरातच्या बॉक्सरला पराभूत केले.
दुसरर्या लढतत आंध्रपदेशच्या बॉक्सरला पराभूत केले आणि तिसर्या लढतीत जम्मू काश्मीरच्या बॉक्सरला पराभूत करून सेमिफायनलमध्ये प्रवेश केला. चौथा सामना अरुणाचल प्रदेशच्या बॉक्समध्ये झाल्यानंतर विराटचा 5.4 ने म्हणजे एक अंकाने त्याचा पराभव झाला.
विराट कोळी याला अनमोल आणि ध्येयप्राप्तीचे मार्गदर्शन एन.आय.एस.राष्ट्रीय कोच नरेंद्र अरुण मोरे (बाळा भाऊ मोरे) यांचे लाभले. सोबतच अकॅडमीचे कोच धीरज सोनवणे यांनीही मार्गदर्शन केले. त्याच्या यशाबद्दल अध्यक्ष नितेश तायडे, सचिव गणेश वाघोदे, बॉक्सर मनोज घारू यांनी त्याचे अभिनंदन केे आहे शिवाय त्यास वेळोवेळी मार्गदर्शनही केले आहे. विराटने मिळवलेल्या यशानंतर शहरातील छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अॅकेडमीचाही सर्वदूर डंका वाजला आहे.


