सफाई कर्मचार्याने स्वत:चे कपडे काढत इंटर्न विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य

Cleaning worker removes his clothes and performs obscene act in front of intern student नागपूर (7 मे 2025) : मेयो इस्पितळात एका इंटर्न तरुणीसमोर लिफ्टमध्ये सफाई कर्मचार्याने स्वत:चे कपडे काढून अश्लील कृत्य केले. या घटनेमुळे मेयोत खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे इंटर्न्समध्ये संतापाचे वातावरण आहे. मनोहर नत्थुलाल समुद्रे (वय 52, आदर्शनगर, मानकापूर) असे आरोपीचे नाव आहे.
संबंधित तरुणीचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाले असून तिची मेयोत इंटर्नशिप सुरू आहे. सोमवारी साडेदहा वाजताच्या सुमारास ती मेयोत होती. तिला वॉर्ड क्रमांक 36 मध्ये जायचे होते. त्यासाठी ती सर्जिकल कॉम्प्लेक्समधील ऑपरेशन थिएटरसमोरील लिफ्टने दुसर्या माळ्यावर जायला निघाली. लिफ्टमध्ये मनोहरदेखील होता व त्याला चौथ्या मजल्यावर जायचे होते. त्याच्याजवळ काही सामान होते.

तरुणीने दुसर्या माळ्यावर जाण्यासाठी बटन दाबले. लिफ्ट वर जाऊ लागताच त्याने घाणेरडे चाळे सुरू केले. त्याने पॅन्ट व अंतर्वस्त्र काढले आणि अश्लील चाळे सुरू केले. यामुळे इंटर्न हादरली. तिने हा काय प्रकार आहे अशी विचारणा केली व तेवढ्यात दुसरा माळ्यावर लिफ्टचा दरवाजा उघडला. ती धावतच बाहेर पडली. ती हादरली असल्याने वॉर्डमध्ये न जाता पायर्यांनी खाली गेली व तिने इतर इंटर्न्सला आपबीती सांगितली. सर्वांनी आरोपीचा शोध सुरू केला. मात्र, तो दिसला नाही. काही वेळाने तो बाहेरच्या बाजूला दिसला. त्याला इंटर्न्सनी पकडले. तरुणीच्या तक्रारीवरून तहसील पोलिस ठाण्यात आरोपी मनोहरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

/>
/>
/>
/>