उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले पंतप्रधानांचे अभिनंदन ; म्हणाले, लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणार्यांना धडा शिकवला
मुंबई (7 मे 2025) : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानी दहशतवादी तळांवर हल्ले करीत 9 दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करण्यात आले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. आपल्या देशातले निष्पाप पर्यटक पहलगामला गेले होते. आपल्या मुली, आपल्या आया-बहिणींच्या समोर, लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं कुंकू पुसण्याचे काम अतिरेक्यांनी केलं. त्यांच्या कर्त्या पुरुषांना गोळ्या घालून त्यांची हत्या करण्याचं पाप केले मात्र पंतप्रधानांनी लाडक्या बहिणींचे कुंकू पुसणार्यांना धडा शिकवला आहे.


