खरिपाच्या तोंडावर सोयगावात कर्जापुढे हात ठेकत शेतकरी पूत्राची आत्महत्या


Farmer’s son commits suicide in Soygaon due to debt at the beginning of Kharif season सोयगाव (9 मे 2025) : गत वर्षीच्या खरीप हंगामासाठी घेतलेले पेरणी साठी काढलेले खाजगी व राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज न फेडल्या गेल्याने व आगामी खरीप हंगामात पेरणीची चिंता असलेल्या शेतकरी पुत्राने घरातच झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आर्थिक विवंचनेत आत्महत्या केली. ही घटना सोयगावच्या आमखेड्यात गुरुवारी दुपारी अडीच वाजता घडली. दीपक अर्जुन नागपुरे (35, रा.शिवाजीनगर आमखेडा, सोयगाव) असे मृत झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

घरातील झोकाच्या दोरीला गळफास घेत या शेतकरी पुत्राने कर्जाच्या विवंचनेत जीवन संपविले आहे. परिसरातील नागरिकांच्या लक्षात हा प्रकार येताच तातडीने त्यास सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिक्षक डॉ दिनाजी खंदारे यांनी तपासून मृत घोषित केले.

दरम्यान या शेतकरी पुत्रकडे वडिलांच्या नावे एकरभर शेती आहे. हाती आलेल्या शेतमालाला योग्य दर न मिळाल्याने त्यांचे कर्ज फिटले नव्हते त्यांच्या कडे असलेले खासगी व बँकांचे कर्जाची दोन लक्ष पन्नास हजार रु फेडण्याच्या विवंचनेत या शेतकरी पुत्राने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला. महसूलच्या पंचनाम्यात शेतकरी पुत्राने कर्जाच्या आर्थिक विवंचनेत गळफास घेतल्याचे नमूद करण्यात आले.

सोयगाव पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे या घटनेमुळे सोयगाव व आमखेड्यातील शिवाजी नगर भागात हळहळ व्यक्त होत आहे. मृताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, बहिण, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सोयगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ दिनाजी खंदारे यांनी शवविच्छेदन केले


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !