जळगावात महाविद्यालयाजवळील पॉश कुंटणखान्यावर पोलिसांची कारवाई : दाम्पत्यासह दोन आंबटशौकीन गिर्‍हाईक ताब्यात

तीन महिलांची सुटका :l कारवाईने शहरात उडाली खळब्ळ


न्युज डेस्क । जळगाव (9 मे 2025) : जळगाव शहरातील खेडी परिसरातील एका कॉलेजजवळ बेकायदेशीर कुंटणखान्यावर शनीपेठ पोलिसांनी कारवाई केली. यावेळी तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली तर दोन गिर्‍हाईक आणि व्यवसाय चालविणार्‍या दाम्पत्यासह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहरातील खेडी परिसरातील एका कॉलेजजवळ बेकायदेशीर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती शनिपेठ पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार, गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली तर दोन गिर्‍हाईक आणि व्यवसाय चालविणारे दांपत्यासह एक असे एकूण 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


 

 











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !